Prabhani Farming : रब्बी हंगाम संपला; शेतकऱ्यांची खरीपाची लगभग सुरू, मशागतींवर भर
रब्बी हंगाम आटोपून शेतकरी आता मशागतित गुंतला आहे. पण वाढती महागाई आणि वाढलेले इंधनाचे दर यामुळे ट्रॅक्टरच्या मशागती करण्यात अडचणी येत आहेत
परभणी : राज्यात झालेल्या अवकाळीमुळे अनेकांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यातच रब्बी हंगामही संपला. या रब्बी हंगामात हाताला काही मिळालं नाही किमान खरीपात तरी काही मिळेल या आशेने बळीराजा कामाला लागला आहे. रब्बी हंगाम आटोपून शेतकरी आता मशागतित गुंतला आहे. पण वाढती महागाई आणि वाढलेले इंधनाचे दर यामुळे ट्रॅक्टरच्या मशागती करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतकरी आता पुन्हा पारंपरिक मशागतीकडे वळला आहे. जिल्ह्यात कापसाच्या शेतीतील पऱ्हाट्या काढणीला सुरुवात झाली असून, पारंपरिक पद्धती मशागतींच्या कामांना वेग आला आहे. लोक ट्रॅक्टरच्या मशागतीसह बैलांच्या पारंपरिक मशागतींवर भर देताना दिसत आहे.
Published on: Apr 12, 2023 08:37 AM
Latest Videos