अयोध्येतील राममंदिरासाठी चंद्रपूरातील आल्लापल्लीतील सागवान
प्रभू श्रीरामाच्या भव्य मंदिराचे बांधकाम अयोध्येत सुरू आहे. या बांधकामासाठी देशभरातून साहित्य पाठविले जात असून महाराष्ट्राच्या चंद्रपूर मधूनही काष्ठ पाठवले जात आहेत
चंद्रपूर : उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिराचे काम सुरू आहे. रामजन्मभूमी मंदिराच्या बांधकामाकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे. तर आता महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब समोर आली असून अयोध्यातील ऐतिहासिक वास्तूसाठी गडचिरोली येथून लाकूड जाणार आहे. राम लल्लाच्या भव्य मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासाठी लागणारे सागवानी लाकूड हे चंद्रपूरातील आल्लापल्लीतील सागवान लाकडाचा वापर करण्यात येणार आहे.
प्रभू श्रीरामाच्या भव्य मंदिराचे बांधकाम अयोध्येत सुरू आहे. या बांधकामासाठी देशभरातून साहित्य पाठविले जात असून महाराष्ट्राच्या चंद्रपूर मधूनही काष्ठ पाठवले जात आहेत. या काष्ठांच्या पूजनाचा सोहळा आज चंद्रपूर येथे होत असून आध्यात्मिक गुरू, राजकीय नेतेमंडळी, शेकडो कलावंत आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा भव्यदिव्य सोहळा होणार आहे. दरम्यान ज्या वखारीतून सागाचे लाकूड पाठवण्यात येणार आहे.