2024 मध्ये एनडीएचा पराभव निश्चित? ठाकरे गटाच्या आमदाराने सांगितलं कारण…
काल दिल्लीत सत्ताधारी पक्षांची महत्त्वाची बैठक पार पडली. भाजपकडून ही बैठक आयोजित करण्यात आली होती.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीवरून ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी खळबळजनक दावा केला आहे.
मुंबई, 19 जुलै 2023 | काल दिल्लीत सत्ताधारी पक्षांची महत्त्वाची बैठक पार पडली. भाजपकडून ही बैठक आयोजित करण्यात आली होती.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. नवी दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत घटक पक्षांना देखील आमंत्रण देण्यात आलं होतं. याच पार्श्वभूमीव ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “भाजपने काल आपल्या मित्रपक्षांना बैठकीचे आमंत्रण दिले होते. शिवसेना हा ही भाजपचा मित्रपक्ष होता पण त्याला फोडण्याचं काम भाजपने केलं. आता भाजपला एक आमदार असलेल्या मित्र पक्षाला देखील बैठकीला बोलवावं लागतंय. ही वेळ भाजपवर का आली आणि म्हणून 2024 मध्ये एनडीएचा पराभव होईल. “
Published on: Jul 19, 2023 12:59 PM
Latest Videos