Vaibhav Naik : राणेंनी किती सुपाऱ्या दिल्या हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत, वैभव नाईक यांचा नारायण राणेंना टोला

Vaibhav Naik : राणेंनी किती सुपाऱ्या दिल्या हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत, वैभव नाईक यांचा नारायण राणेंना टोला

| Updated on: Jul 26, 2022 | 11:08 PM

राणेंच्या मुलाने दिघे आणि बाळासाहेबांबद्दल काय उद्गार काढले होते, ते लोक विसरले नाहीत. राणेंच्या बोलण्याकडे फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदे सुद्धा लक्ष देत नाहीत, असा टोला वैभव नाईक यांनी लगावला आहे.

सिंधुदुर्ग : नारायण राणेंनी (Narayan Rane) याआधी किती सुपाऱ्या दिल्या हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. राणेंच्या पुत्राने सुद्धा सुपारी देऊन शिवसैनिकावर हल्ला केला होता. सुपारीबाज राणेंनी आमच्या नेत्यांवर आरोप करणे चुकीचे आहे, अशी टीका शिवसेना नेते वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी केली आहे. राणेंना त्यांना मारण्याची सुपारी कोणी दिली, हे माहीत असेल तर ते त्यांनी पोलिसांना, सीबीआयला सांगितल पाहिजे. ते केंद्रीयमंत्री आहेत. जर कोणाचा खरोखरच सहभाग असेल तर निश्चितपणे कारवाई होईल. त्याला शिवसेनेचा (Shivsena)  विरोध असण्याचे कारण नाही. राणेंच्या मुलाने दिघे आणि बाळासाहेबांबद्दल काय उद्गार काढले होते, ते लोक विसरले नाहीत. राणेंच्या बोलण्याकडे फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदे सुद्धा लक्ष देत नाहीत, असा टोला त्यांनी लगावला आहे.
Published on: Jul 26, 2022 11:08 PM