Vaibhav Naik | मोहीत कंबोज ईडीचे एजंट असल्याची वैभव नाईक यांची टीका- TV9
वैभव नाईक यांनी मोहीत कंबोज यांच्यावर टीका करताना, कंबोज हे ईडीचे एजंट असल्याचे म्हटलं आहे.
मुंबई : मोहित कुंभोज यांनी अजितदादां पवार यांच्यावर कारवाई होईल असा इशारा दिल्यानंतर आता भाजप आणि विरोधक आमने-सामने येण्याची चिन्ह दिसत आहेत. यावरूनच वैभव नाईक यांनी मोहीत कंबोज यांच्यावर टीका करताना, कंबोज हे ईडीचे एजंट असल्याचे म्हटलं आहे. तसेच राज्यातील जनतेला हे माहित आहेच की, ईडीच्या माध्यमातून चौकशा लावायच्या आणि त्यातूनच दबाव आणायचा कोण काम करत आहे. गेल्या दोन वर्षापासून हे असं सुरू आहे. मविआ सरकार पाडलं. मात्र सरकार राहतचं असं नाही कधीतरी हेही सरकार जाईल. लोकांचा उद्रेक हा होईलच. जरी त्यांनी दादांना इशारा दिला तरी आम्ही विरोधी पक्ष म्हणून त्यांच्या मागे सक्षमपणे उभे राहून काम करू.
Latest Videos