यंदा कल्याण लोकसभेचं चित्र बदलणार, वैशाली दरेकर नेमकं काय म्हणाल्या?

यंदा कल्याण लोकसभेचं चित्र बदलणार, वैशाली दरेकर नेमकं काय म्हणाल्या?

| Updated on: Apr 06, 2024 | 5:06 PM

यंदा कल्याण लोकसभेचं चित्र 100 टक्के बदलणार, कल्याणमधील सर्व मतदार उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी आहेत. अशी प्रतिक्रिया वैशाली दरेकर यांनी दिली आहे

Shrikant Shinde vs Vaishali Darekar : अखेर आज कल्याण लोकसभा निवडणुकीच्या जागेचा तिढा सुटला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कल्याणमधून श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार असणार अशी माहिती दिली आहे. त्यामुळे कल्याणमध्ये आता श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर अशी लढत होणार आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वैशाली दरेकर या कल्याण लोकसभेतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल या चिन्हावर निवडणूक लढणार आहेत.

श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीनंतर वैशाली दरेकर काय म्हणाल्या?

यंदा कल्याण लोकसभेचं चित्र 100 टक्के बदलणार, कल्याणमधील सर्व मतदार उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी आहेत. कल्याण लोकसभेत ओरिजनल शिवसेनेचा विजय होणार असं वैशाली दरेकर यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे श्रीकांत शिंदे यांना भारतीय जनता पार्टीचा पूर्ण पाठिंबा असणार आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यामुळे कल्याण मतदार संघाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Published on: Apr 06, 2024 05:01 PM