‘…त्याचवेळी बंदोबस्त केला असता, तर ही वेळ; प्रकाश आंबेडकर यांचे टीकास्त्र, काँग्रेस, राष्ट्रवादीचाही टीका
तर म.गांधी यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून अधिवेशनात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी प्रश्न लावून धरला. तर अमरावतीत यशोमती ठाकूर यांनी आंदोलन करत अटकेची मागणी केली. तर राज्यभर भिडे यांच्याविरोधात आंदोलनं केली आहे. त्यानंतर भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई, 31 जुलै, 2023 | शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यावरून राज्यात अनेक ठिकाणी विरोधकांसह आंबेडकरवादी संघटना रस्त्यावर उतरल्या. त्याचदरम्यान त्यांनी यवतमाळमध्ये देखील पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर देखील गरळ ओकली. ज्यानंतर पुन्हा लोक आक्रमक झाले. तर म.गांधी यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून अधिवेशनात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी प्रश्न लावून धरला. तर अमरावतीत यशोमती ठाकूर यांनी आंदोलन करत अटकेची मागणी केली. तर राज्यभर भिडे यांच्याविरोधात आंदोलनं केली आहे. त्यानंतर भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरूनच आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध करताना संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट करत ही टीका केलीय. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर देखील टीका केली आहे. यावेळी आंबेडकर यांनी, मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने मनोहर कुलकर्णीचा वेळीच बंदोबस्त केला असता तर आता ही वेळ आली नसती, असे टीकास्त्र सोडले आहे.