‘…म्हणून छगन भुजबळ यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा’, कोणी केली मागणी? दिला पवारांचाही दाखला?

‘…म्हणून छगन भुजबळ यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा’, कोणी केली मागणी? दिला पवारांचाही दाखला?

| Updated on: Jun 01, 2023 | 8:13 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असताना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटवले होते. त्यावरून सरकारवर टीका केली जात आहे. यादरम्यान राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी ते पुतळे जाणिवपूर्वक हटविण्यात आले का असा सवाल केला होता

मुंबई : दिल्लीतील महाराष्ट्र सदनात दोन दिवसांपूर्वी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असताना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटवले होते. त्यावरून सरकारवर टीका केली जात आहे. यादरम्यान राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी ते पुतळे जाणिवपूर्वक हटविण्यात आले का असा सवाल केला होता. त्याचमुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख डॅा. प्रकाश आंबेडकर यांनी भुजबळ यांच्यावर निशाना साधला आहे. तसेच भुजबळ हे फुले कुटुंबियांचे आम्ही फार मोठे भक्त आहोत असे भासवितात. त्यामुळे पुतळा हटविल्या प्रकरणी भुजबळ यांनी राजीनामा द्यावा. तर याच्याआधी 1992 साली आंबेडकर यांच्या रिपब्लिकन पक्षाचे आमदार मखराम पवार यांनी 114 गोवारींची हत्ये प्रकरणी राजीनामा दिला होता. त्यांनी ‘ज्या सभागृहात संवेदनशीलता नाही त्या सभागृहाचा मी राजीनामा देत आहे’ असे सांगत आमदारकीचा राजीनामा दिला होता. तसा पवार यांचा कित्ता भुजबळ गिरवावा.

Published on: Jun 01, 2023 08:13 AM