वंचित आघाडीचं ठरलं; प्रकाश आंबेडकर यांनीही शड्डू ठोकला; ‘या’ मतदारसंघातून उतरणार लोकसभेच्या रिंगणात
मध्यावधीतच लोकसभेच्या निवडणुका होतील, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. त्यापाठोपाठ आता त्यांना आणखी एक घोषणा केली आहे. यावेळी आंबेडकर यांनी थेट लोकसभा निवडणुकांसाठी वंचित आघाडीकडून भूमिका स्पष्ट केली आहे.
अकोला, 13 ऑगस्ट 2023 | आगामी काळात चार राज्यांच्या निवडणुका होणार नसून मध्यावधीतच लोकसभेच्या निवडणुका होतील, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. त्यापाठोपाठ आता त्यांना आणखी एक घोषणा केली आहे. यावेळी आंबेडकर यांनी थेट लोकसभा निवडणुकांसाठी वंचित आघाडीकडून भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी, लोकसभा निवडणुका कधीही लागू शकतात. त्यामुळे भाजप, आरएसएस यांच्या उमेदवाराला पराभूत करून आपण निवडणुका जिंका असे आवाहन वंचितच्या उमेदवारांना केलं आहे. तर देशातील परिस्थिती बदलायची असेल तर भाजपचा पराभव केलाच पाहिजे. म्हणून वंचित आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा असं सर्व मतदारांना देखील आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. याचवेळी त्यांनी आपण स्वतः निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली आहे. तर अकोला मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं आहे.