प्रकाश आंबडकर यांच्या इशारा योग्य? ठाकरे गटाचा नेताच म्हणाला, ”त्यात…”
आंबेडकर यांनी महाविकास आघाडीच्या नादी लागू नये. काँग्रेस केंद्रीय नेतृत्वात अडकलं आहे. तर राष्ट्रवादी कुटुंबवादात अडकलेलं आहे, असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे. त्यावरून आता ठाकरे गटाचे विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी बोलकी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीपासून सावध राण्याचा सल्ला दिला होता. त्यावरून आता राज्याच्या राजकारणात वेग वेगळ्या चर्चा सुरू आहेत. यावरून भाजपसह शिंदे गटातील मंत्री आणि नेत्यांनी टीका केली आहे. आंबेडकर यांनी महाविकास आघाडीच्या नादी लागू नये. काँग्रेस केंद्रीय नेतृत्वात अडकलं आहे. तर राष्ट्रवादी कुटुंबवादात अडकलेलं आहे, असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे. त्यावरून आता ठाकरे गटाचे विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी महाविकास आघाडीच्या नादाला लागू नका अस ते म्हणाले नाहीत. पण मित्रत्वाच्या नात्याने काही भूमिकांवर त्यांनी मत व्यक्त केलंय त्यात काही चुकीचं आहे असं वाटत नाही असं ते म्हणालेत.
Latest Videos