बीबीसीच्या कार्यलयावर आयकर विभागाची धाड; वंचितकडून निषेध; पाहा...

बीबीसीच्या कार्यलयावर आयकर विभागाची धाड; वंचितकडून निषेध; पाहा…

| Updated on: Feb 15, 2023 | 3:27 PM

बीबीसीच्या कार्यालयावर आयकर विभागाने धाड टाकली आहे. त्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध करण्यात आला आहे. पाहा...

मुंबई : बीबीसीच्या कार्यालयावर आयकर विभागाने धाड टाकली आहे. त्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध करण्यात आला आहे. “भारत सरकारच्या इन्कम टॅक्स विभागाने BBC वर घातलेल्या धाडीचा वंचित बहुजन आघाडी निषेध करते. बीबीसी ही आंतरराष्ट्रीय किर्तीची आणि जागतिक महायुद्धांमध्ये किंवा आंतरराष्ट्रीय घुसखोरीच्या प्रसंगांमध्ये प्रत्यक्ष फिल्ड वरून थेट प्रक्षेपण करणारी वृत्तवाहिनी म्हणून जगभरामध्ये तिला मान्यता आहे. या कारवाईचे परराष्ट्र संबंधावर अत्यंत गंभीर परिणाम होऊ शकतात याचं भान भारत सरकारने बाळगलेलं नाही आणि दक्षता घेतलेली नाही.ही कारवाई का केली त्याच्याबद्दलचा खुलासा भारत सरकारने केला पाहिजे”, असं वंचितच्या नेत्या रेखा ठाकूर यांनी म्हटलं आहे.

Published on: Feb 15, 2023 03:27 PM