वारकरीही संभाजी भिडे यांच्याविरोधात, घेतली शरद पवार यांची भेट, केली तक्रार

| Updated on: Jul 31, 2023 | 12:55 PM

काँग्रेसकडून या विरोधात आक्रमक भूमिका घेण्यात आली असून संभाजी भिडे यांच्याविरोधात आंदोलने केली जात आहेत. तर सत्तेत सहभागी असणाऱ्यांनीही आता आपल्या संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी भिडे यांना अटक झाली पाहिजे असे म्हटलं आहे.

मुंबई, 31 जुलै 2023 | संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेसकडून या विरोधात आक्रमक भूमिका घेण्यात आली असून संभाजी भिडे यांच्याविरोधात आंदोलने केली जात आहेत. तर सत्तेत सहभागी असणाऱ्यांनीही आता आपल्या संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी भिडे यांना अटक झाली पाहिजे असे म्हटलं आहे. तर प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी संभाजी भिडे यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. तर तिरंग्याचा अपमान आम्ही सहन करणार नाही असा इशारा दिला आहे. याचदरम्यान राज्यातील वारकरी ही संभाजी भिडे यांच्याविरोधात आता उठला आहे. यावेळी वारकऱ्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे. तर वारकऱ्यांनी पवार यांच्याकडे भिडे यांच्याविरोधात तक्रार केली आहे.

Published on: Jul 31, 2023 12:55 PM