“मणिपूर घटनेवर विधानसभेत आम्हाला बोलू दिलं नाही”, वर्षा गायकवाड यांचा आरोप
आज विधानसभेत मणिपूर हिंसाचार आणि अत्याचारा मुद्दा चांगलाच गाजला. मणिपूरच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले. परंतु सभागृहात मणिपूरच्या मुद्द्यावर बोलू दिलं जात नाही, असा आरोप करत विरोधकांनी सभा त्याग केली. याच पार्श्वभूमीवर वर्षा गायकवाड यांनी भाष्य केलं आहे.
मुंबई, 21 जुलै 2023 | आज विधानसभेत मणिपूर हिंसाचार आणि अत्याचारा मुद्दा चांगलाच गाजला. मणिपूरच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले. परंतु सभागृहात मणिपूरच्या मुद्द्यावर बोलू दिलं जात नाही, असा आरोप करत विरोधकांनी सभा त्याग केली. याच पार्श्वभूमीवर वर्षा गायकवाड यांनी भाष्य केलं आहे. याच पार्श्वभूमीवर वर्षा गायकवाड यांनी भाष्य केलं आहे. त्या म्हणाल्या की, “मणिपूरमध्ये माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. तिथे दोन महिलांची विवस्त्र करून धिंड काढण्यात आली. त्या घटनेसंदर्भात बोलण्यासाठी आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे वेळ मागितला. परंतु आम्हाला बोलू दिलं नाही. मणिपूरच्या घटनेचा देशभरातील लोक निषेध करत आहेत. आम्हाला वाटतं की, विधीमंडळाच्या माध्यमातून याबाबत एक ठराव झाला पाहिजे. त्या महिलांना संरक्षण मिळालं पाहिजे. मणिपूर सरकारचा धिक्कार झाला पाहिजे. यासंदर्भात ठराव व्हावा, अशी भावना आम्ही व्यक्त केली. परंतु आम्हाला बोलायची संधी मिळाली नाही. विधानसभा अध्यक्षांकडे आम्ही यासाठी पाच मिनिटं मागितली. परंतु आम्हाला वेळ दिला नाही. त्यामुळे आम्ही सभात्याग केला.”