पालिका निवडणुका स्वबळावर लढवणार की युतीत? काय म्हणाल्या वर्षा गायकवाड?
काँग्रेसच्या माजी मंत्री आणि आमदार वर्षा गायकवाड यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अध्यक्षपदी नियुक्त झाल्यानंतर वर्षा गायकवाड अॅक्शन मोडमध्ये आल्या आहेत. वर्षा गायकवाड यांनी रविवारी सिध्दीविनायकाचे दर्शन घेतले.यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मुंबई : काँग्रेसच्या माजी मंत्री आणि आमदार वर्षा गायकवाड यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अध्यक्षपदी नियुक्त झाल्यानंतर वर्षा गायकवाड अॅक्शन मोडमध्ये आल्या आहेत. वर्षा गायकवाड यांनी रविवारी सिध्दीविनायकाचे दर्शन घेतले.यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. “खूप मोठी जबाबदारी माझ्यावर पक्ष श्रेष्ठींनी टाकली आहे. सर्वांना सोबत घेऊन मी कार्य करणार आहे. निवडणुकीत प्रत्येकाला विश्वासात घेऊन काम करणार आहे. भाई जगताप नाराज नाहीत, मी त्यांना भेटणार आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांशी बोलून आणि पक्ष श्रेष्ठी जे सांगतील त्याप्रमाणे आघाडी करायची की स्वबळावर ठरेल. आज माझ्यावर इतकी मोठी जबाबदारी आली आणि माझे वडील माझ्या सोबत नाही याची खंत दुःख आहे, ते असते तर आणखी बळ मिळाले आसते”, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
Published on: Jun 12, 2023 10:34 AM
Latest Videos