“नेते झाले म्हणून अन्याय झाला का?”, राहुल कनाल यांच्या प्रश्नावर वरुण सरदेसाई यांची प्रतिक्रिया
ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देणार आहेत. राहुल कनाल उद्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. राहुल कनाल यांच्या जाण्याने ठाकरे गटाच्या युवासेनेला मोठा धक्का बसला आहे. याच पार्श्वभूमीवर युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नाशिक : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देणार आहेत. राहुल कनाल उद्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. राहुल कनाल यांच्या जाण्याने ठाकरे गटाच्या युवासेनेला मोठा धक्का बसला आहे. याच पार्श्वभूमीवर युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राहुल कनाल माझे चांगले मित्र आहेत. आम्ही इतके दिवस एकत्र काम करत होतं. शिवसेनेची सत्ता गेल्यानंतर आता प्रत्येकजण कारणं देत आहेत. पण जेव्हा युवासेनेचे स्थापना झाली तेव्हा अनेकांना वेगवेगळ्या संध्या देण्यात आल्या. आदित्य ठाकरे यांनी संधी दिली म्हणून ते युवानेते झाले. नेते झाले म्हणून अन्याय झाला का? आदित्य ठाकरे यांच्यासोबत काम करावे म्हणून कमी लोकांना संधी मिळते. म्हणून महत्वकांक्षा वाढते, “असं सरदेसाई म्हणाले. तसेच वरुण सरदेसाई यांनी नितेश राणे यांच्यावरही टीका केली आहे. “क्रेडिबिलिटी असणाऱ्या व्यक्तीला उत्तर द्यायचं. ज्याला जे बोलायचे असते, ते बोलुद्या, कुणी उठून काहीही बोलेल, सगळ्याच गोष्टींना उत्तरं नसतात द्यायची,” असं ते म्हणालेत.