‘मनसे’ला ठोकला रामराम पण ‘मनसे’च्या पाठिंब्यासाठी ‘वंचित’चे वसंत मोरे आशावादी

| Updated on: Apr 14, 2024 | 11:24 AM

एक महन्यापूर्वी परतीचे दोर कापल्याचे म्हणणाऱ्या वसंत मोरेंनी राजकीय पाठिंब्यासाठी राज ठाकरेंच्या भेटीची इच्छा वर्तविली आहे. या प्रश्नावर राज ठाकरे यांनी बोलणं टाळलं. वसंत मोरेंनी मनसेच्या पाठिंब्याची आशा व्यक्त केल्याने वंचितचे समर्थक आश्चर्य व्यक्त करताय.

Follow us on

मनसे सोडत वंसत मोरे यांनी वंचितमध्ये प्रवेश करत पुणे लोकसभेची उमेदवारी मिळवली. तर मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. मात्र मनसेच्या पाठिंब्यासाठी वसंत मोरे आशावादी आहेत. एक महन्यापूर्वी परतीचे दोर कापल्याचे म्हणणाऱ्या वसंत मोरेंनी राजकीय पाठिंब्यासाठी राज ठाकरेंच्या भेटीची इच्छा वर्तविली आहे. या प्रश्नावर राज ठाकरे यांनी बोलणं टाळलं. वसंत मोरेंनी मनसेच्या पाठिंब्याची आशा व्यक्त केल्याने वंचितचे समर्थक आश्चर्य व्यक्त करताय. वसंत मोरे हे वंचितचे उमेदवार आहेत. त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर असून संविधानासाठी भाजपला सत्तेपासून दूर करणं गरजेचं असल्याचा दावा केला. तर दूसरीकडे देशाचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक असल्याचे म्हणत मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलाय. तर त्याच राज ठाकरेंनी आपल्याला पाठिंबा द्यावा, यासाठी वसंत मोरे आशावादी असल्याचे पाहायला मिळत आहे.