या दिवशी राज ठाकरे पुन्हा पुण्यात येणार; वसंत मोरे यांनी तारीख अन् कारण सांगितलं
Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्याच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या दौऱ्यावर वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं काय म्हणालेत? पाहा...
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्याच्या दौऱ्यावर होते. पुण्यातील पु ल.देशपांडे सभागृहात राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी कामाचा आढावा घेतला. पक्षासोबत काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांशी साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या दौऱ्यावर मनसे नेते वसंत मोरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका कार्यक्रमासाठी राज ठाकरे पुन्हा 26 मार्चला पुण्यात येणार आहेत. डॉग पॉंडच उद्घाटन करण्यासाठी ते पुण्यात येतील, अशी माहिती वसंत मोरे यांनी दिली आहे. 22 मार्चच्या सभेसाठीही बैठका घेण्याच्या सूचना राज ठाकरे यांनी दिल्या. सभेला जास्तीत जास्त कार्यकर्ते आणण्यासाठी सूचना दिल्या. तसंच पुणे महापालिकेत मनसेची सत्ता आणण्याच्या दृष्टीने काम सुरू आहे, असं मोरे यांनी सांगितलं आहे.
Published on: Mar 12, 2023 03:31 PM
Latest Videos