VIDEO : वासुदेव आला…वासुदेव आला, हरवत चालेल्या वासुदेवांची नीरा घाटावर गर्दी
डोक्यावर मोरपिसांची टोपी, हातात टाळ आणि तोंडात संतांचे अभंग असं लोभसवाणं रुप घेऊन वासुदेव नेहमी शहरांत-गावात सकाळी फिरायचा. मात्र काळ जसा बदलला तसा शहरातला वासुदेवही हरवला.
पुणे : वासुदेव आणि महाराष्ट्राचं एक वेगळं नातं आहे. डोक्यावर मोरपिसांची टोपी, हातात टाळ आणि तोंडात संतांचे अभंग असं लोभसवाणं रुप घेऊन वासुदेव नेहमी शहरांत-गावात सकाळी फिरायचा. मात्र काळ जसा बदलला तसा शहरातला वासुदेवही हरवला. कधी काळी गावाप्रमाणे शहरातही वासुदेव आला रे वासुदेव आला सकाळच्या पारी हरिनाम बोला हे वासुदेवाचं अभंगाचं कडवं ऐकायलातरी मिळायचं पण आता ते ही दुरापास्त होताना दिसत आहे. मात्र आज पुण्या एक नाही तर अनेक वासूदेव पहायला मिळाले. निमित्त होतं निरा नदीत स्नानाचं. त्यामुळं नीरा घाटावर वासुदेवांची गर्दी पहायला मिळाली. यावेळी कुळाचा उद्धार करत वासुदेव वारकऱ्यांचीही सेवा करताना दिसले. स्नान केल्यानंतर कुळाचा उद्धार वासुदेव करतात मात्र आज गावात येणारा वासुदेव हरवत चाललाय. मात्र आज भेटलेल्या वासुदेव वारकऱ्यांनी टीव्ही 9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी सादर केला अभंग पहा…