Ajit Pawar | ‘वेदांता प्रकल्पासंदर्भातील शेलारांचे आरोप खोटे’अजित पवार-tv9
विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी अशिष शेलार यांच्यावर टीका केली आहे. तसेच वेदांता प्रकल्पासंदर्भातील शेलारांचे आरोप हे खोटे असल्याचे म्हटलं आहे.
राज्यात होणार वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राजकारण्यांचे एकमेकांवर टीका करणे सुरूच आहे. मुंबई भाजपच्या प्रदेशाध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी हा प्रकल्प राज्यात आला होता कधी असा सवाल उपस्थित करत तत्कालिन महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर टीका केली होती. तसेच त्याचे पुरावे सादर करा असे आवाहन केले होते. त्यानंतर आता विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी अशिष शेलार यांच्यावर टीका केली आहे. तसेच वेदांता प्रकल्पासंदर्भातील शेलारांचे आरोप हे खोटे असल्याचे म्हटलं आहे. त्याचबरोबर वेदांता प्रकल्प हा गुजरातमध्ये कसा गेला याची चौकशी करा अशी मागणी केली आहे. तर चौकशी अंती सत्य समोर येईल आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल असेही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
Published on: Sep 17, 2022 05:33 PM
Latest Videos