Deepak Kesarkar : वेदांता प्रकल्प गुजरातला..! हे पाप कुणाचे, केसरकरांचा निशाणा कुणावर?

Deepak Kesarkar : वेदांता प्रकल्प गुजरातला..! हे पाप कुणाचे, केसरकरांचा निशाणा कुणावर?

| Updated on: Sep 15, 2022 | 10:10 PM

वेदांता हा प्रकल्प गुजरातला हा काही एका रात्रीतून गेलेला नाही तर यामागे बरीच प्रक्रिया असते. त्यामुळे शिंदे सरकारच्या काळात नाही तर महाविकास आघाडीच्या काळातच हा प्रकल्प गुजरातला गेल्याचे स्पष्टीकरण केसरकर यांनी दिले आहे. राज्यात आलेल्या उद्योजकांसाठी साधी भेटही मविआ सरकारच्या काळात घेतली जात नव्हती.

मुंबई :  (Vedanta Project) वेदांता प्रकल्प हा (Gujrat) गुजरातला गेल्याने राज्यात आरोप-प्रत्यारोपाने राळ उडाली आहे. आतापर्यंत शिवसेना भाजपामध्ये हे आरोप सुरु असताना यामध्ये शिंदे गटाचे प्रवक्ते आणि शालेय शिक्षण मंत्री (Deepak Kesarkar) दीपक केसरकर यांनी उडी घेतली आहे. वेदांता हा प्रकल्प गुजरातला हा काही एका रात्रीतून गेलेला नाही तर यामागे बरीच प्रक्रिया असते. त्यामुळे शिंदे सरकारच्या काळात नाही तर महाविकास आघाडीच्या काळातच हा प्रकल्प गुजरातला गेल्याचे स्पष्टीकरण केसरकर यांनी दिले आहे. राज्यात आलेल्या उद्योजकांसाठी साधी भेटही मविआ सरकारच्या काळात घेतली जात नव्हती. उद्योग उभारणीसाठी ते सरकार किती गाफील होते याचा आपण साक्षीदार असल्याचेही केसरकर यांनी सांगितले आहे. शिंदे सरकारमधील मंत्री तळमळीने काम करीत असताना असे आरोप म्हणजे विकास कामाला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे केसरकर म्हणाले आहेत.

Published on: Sep 15, 2022 10:09 PM