…तर ‘वेदांता’ची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी होणार ; उद्योगमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
सध्या वेदांताचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. विरोधकांकडून शिंदे, फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. या टीकेला आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मुंबई : सध्या वेदांताचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. विरोधकांकडून शिंदे, फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. उद्योग मंत्र्यांनाच प्रकल्पाबाबत काहीच माहिती नव्हते असा टोला युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी लगावला होता. आदित्य ठाकरे यांच्या या टीकेला आता उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. उद्योग खात्यात काय गोंधळ सुरू होता तो मी शोधून काढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच भाजप (BJP) नेते आशिष शेलार यांनी वेदांता प्रकल्पाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी अशी मागणी केली आहे. वेळ पडल्यास वेदांता प्रकल्पाची चौकशी निवृत्ती न्यायाधीशांमार्फत करण्यात येईल असेही सामंत यांनी म्हटले आहे. आठ महिने या प्रकल्पाबाबत महाविकास आघाडी सरकारने बैठक का घेतली नाही? असा सावलही उदय सामंत यांनी उपस्थित केला आहे.
Published on: Sep 18, 2022 10:06 AM
Latest Videos