Special Report | शेतकऱ्यांना मदत, मंत्रिमंडळ विस्तारावरून अजितदादा-फडणवीसांमध्ये शाब्दिक चकमक
शेतकऱ्यांच्या विषयावरुनच अजित पवार आणि फडणवीस आमनेसामने आलेत असं नाही..तर मविआ सरकारच्या कामांना शिंदे-फडणवीसांनी जी स्थगिती दिली, त्यावरुनही अजित पवार संतापलेत. संभाजी महाराजांच्या स्मारकाचा निधी रोखल्याची टीका अजित पवारांनी केली होती. त्यावर अशी कुठलीही स्थगिती दिली नसून, अजित पवारांनी माहितीच घेतली नसल्याचं फडणवीस म्हणालेत.
मुबंई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis ) आणि विरोधी पक्षनेते अजित(Ajit Pawar) पवारांमध्ये सध्या शाब्दिक चकमक सुरु झालीय. अतिवृष्टीमुळं जे नुकसान झालं, त्याची पाहणी करण्यासाठी अजित पवार विदर्भात आहेत. पण शेतकऱ्यांना त्ताकाळ मदतीची मागणी, आणि मंत्रिमंडळ विस्तारावरुन अजित दादा-फडणवीस आमनेसामने आलेत. गडचिरोली, चंद्रपूर, वर्ध्यात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केल्यानंतर अजित पवारांनी शेतकऱ्यांना त्वरित मदतीची मागणी केलीय. त्यावर महाविकास आघाडी सरकार सारखं नाही तर तात्काळ मदत करु असं फडणवीस म्हणाले. मात्र पुन्हा अजित पवारांनी घोषणा नको तर कृती हवी, असा पलटवार केलाय. शिंदे फडणवीसांच्या सरकारला महिना होतोय, मात्र अजून नवे मंत्री महाराष्ट्राला मिळालेले नाहीत, पण मंत्रिमंडळावरील पत्रकारांच्या प्रश्नांनाही अजितदादा वैतागलेत. त्यातूनच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही टोला लगावलाय. शेतकऱ्यांच्या विषयावरुनच अजित पवार आणि फडणवीस आमनेसामने आलेत असं नाही..तर मविआ सरकारच्या कामांना शिंदे-फडणवीसांनी जी स्थगिती दिली, त्यावरुनही अजित पवार संतापलेत. संभाजी महाराजांच्या स्मारकाचा निधी रोखल्याची टीका अजित पवारांनी केली होती. त्यावर अशी कुठलीही स्थगिती दिली नसून, अजित पवारांनी माहितीच घेतली नसल्याचं फडणवीस म्हणालेत.अजित पवारांच्या रोखठोक स्वभावाची झलक, चंद्रपूर दौऱ्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यालाही आली. आवाज चढवून बोलणाऱ्या पदाधिकाऱ्याला अजित पवारांनी झापलंय.