मेरिटच्या आधारे निर्णय घ्यावा, कोणी हेकेखोरी करु नये, नाना पटोले यांचा कोणाला टोला

महाविकास आघाडीत जागा वाटपावरुन घमासान सुरुच आहे. महाविकास आघाडीतील कॉंग्रेसचे नेते नाना पटोले आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या जोरदार वाकयुद्ध सुरु झाले आहे. संजय राऊत यांनी आज रात्री उशीरापर्यंत बैठका घेऊन मार्ग काढला जाईल असे म्हटले आहे.

मेरिटच्या आधारे निर्णय घ्यावा, कोणी हेकेखोरी करु नये, नाना पटोले यांचा कोणाला टोला
| Updated on: Oct 19, 2024 | 4:16 PM

महाराष्ट्रात निवडणूकांचे बिगुल वाजले आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणूका होणार  आहेत. यासाठी सर्वच पक्षात जागा वाटपावर बोलणी सुरु झालेली आहे. महाविकास आघाडीत जागा वाटपावरुन धुसफूस सुरु झाली आहे. नागपूर उत्तर – दक्षिण यावरुन कॉंग्रेस जागा सोडायला तयार नाही. विदर्भात लोकसभेच्या वेळी कॉंग्रेसला मोठे यश मिळाल्याने कॉंग्रेसने विदर्भात जादा जागा मागितल्या आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी जागावाटपावरुन थोडी महाविकास आघाडीत चर्चा सुरु आहेत, परंतू त्यातून नक्की मार्ग निघेल. असा वाद युती किंवा आघाडीत होतच असतो. आमची देखील भाजपाबरोबर युती असताना जागा लढविण्यावरुन थोडी वादावादी व्हायची, परंतू नंतर आम्ही एकत्र युती म्हणून जागा लढायचो असे संजय राऊत यांनी म्हटले असून रात्री उशीरापर्यंत सर्व मतभेद संपतील असाही दावा केला आहे. तर कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी जागा वाटप मेरीटवर झाले पाहीजे, कोणी हेकेखोरपणा करु नये, जेथे जो निवडून आला ती जागा तो लढविणार असे स्पष्ट केले आहे. नागपूर दक्षिण आणि उत्तर जागा आम्ही सोडणार नाही असेही त्यांनी सांगितले. संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना कॉंग्रेस मोठा राष्ट्रीय पक्ष आहे, आमचा पक्ष प्रादेशिक पक्ष त्यांनी आमच्यासाठी थोड्या जागा सोडायला हव्यात असेही राऊत यांनी म्हटले आहे.

 

Follow us
भाजपाचे माजी खासदार सुरेश वाघमारे वर्ध्यातून निवडणूक लढविण्यास इच्छुक
भाजपाचे माजी खासदार सुरेश वाघमारे वर्ध्यातून निवडणूक लढविण्यास इच्छुक.
विदर्भात कॉंग्रेस सांगली पॅटर्न राबविणार ?काय म्हणाले बाळासाहेब थोरात
विदर्भात कॉंग्रेस सांगली पॅटर्न राबविणार ?काय म्हणाले बाळासाहेब थोरात.
सावंतवाडी मतदार संघावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीत खेचाखेची सुरु
सावंतवाडी मतदार संघावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीत खेचाखेची सुरु.
मेरिटच्या आधारे निर्णय घ्यावा,कोणी हेकेखोरी करु नये - नाना पटोले
मेरिटच्या आधारे निर्णय घ्यावा,कोणी हेकेखोरी करु नये - नाना पटोले.
तासगाव: संजय पाटील यांचे पूत्र प्रभाकर पाटील निवडणूकीच्या मैदानात ?
तासगाव: संजय पाटील यांचे पूत्र प्रभाकर पाटील निवडणूकीच्या मैदानात ?.
नागपूरात कॉंग्रेसचा सांगली पॅर्टन?, कॉंग्रेस-राष्ट्रवादीत घमासान
नागपूरात कॉंग्रेसचा सांगली पॅर्टन?, कॉंग्रेस-राष्ट्रवादीत घमासान.
हेचि फल काय मम तपाला,पडळकर यांना स्थानिक भाजपा नेत्यांचा विरोध
हेचि फल काय मम तपाला,पडळकर यांना स्थानिक भाजपा नेत्यांचा विरोध.
देवेंद्र फडणवीस यांनी तोंडचा घास हिरावला - मनोज जरांगे पाटील
देवेंद्र फडणवीस यांनी तोंडचा घास हिरावला - मनोज जरांगे पाटील.
जागावाटपावरून ठाकरे गट अन् पटोलेंमधील वाद पेटला, मविआत बिघाडी
जागावाटपावरून ठाकरे गट अन् पटोलेंमधील वाद पेटला, मविआत बिघाडी.
शिवाजी पार्कवर मनसेचा दावा, शेवटचा षटकार लगावणार?; रडारवर कोण?
शिवाजी पार्कवर मनसेचा दावा, शेवटचा षटकार लगावणार?; रडारवर कोण?.