भर बैठकीत अंबादास दानवे-संदीपान भुमरे एकमेकांना भिडले, नेमकं कारण काय?

भर बैठकीत अंबादास दानवे-संदीपान भुमरे एकमेकांना भिडले, नेमकं कारण काय?

| Updated on: Aug 07, 2023 | 2:11 PM

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आज जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आणि पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याची पाहायला मिळाली. विरोधी पक्षाच्या आमदारांना कमी निधी देण्याच्या कारणावरुन हा वाद झाला.

औरंगाबाद, 7 ऑगस्ट 2023 | जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आज जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आणि पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यामध्ये बाचाबाची झाली. विरोधी पक्षाच्या आमदारांना कमी निधी देण्याच्या कारणावरुन हा वाद झाला आहे.  दोन्ही नेत्यांचा व्हिडीओ समोर आला आहे.पालकमंत्री संदीपान भुमरे निधी देत नाहीत, असा आरोप कन्नड मतदारसंघाच्या आमदाराने केला. याच मुद्द्यावरून अंबादास दानवे आक्रमक झाले. यावेळी अंबादास दानवे संदीपान भुमरे यांच्या अंगावर धावून गेल्याचं पाहायला मिळालं.  काही वेळाने दोन्ही नेत्यांमधील वाद थांबल्याची माहिती मिळाली आहे.

 

 

Published on: Aug 07, 2023 02:06 PM