यशोमती ठाकूर धमकी प्रकरण, देवेंद्र फडणवीस यांनी दिला शब्द; म्हणाले, दोषींवर कारवाई होणार

यशोमती ठाकूर धमकी प्रकरण, देवेंद्र फडणवीस यांनी दिला शब्द; म्हणाले, “दोषींवर कारवाई होणार”

| Updated on: Aug 02, 2023 | 2:46 PM

राष्ट्रपिता महात्मा गांधींबाबत आक्षेपार्ह विधान करणारे शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडेंविरोधात आज विधानसभेत पडसाद उमटले. आज विधानसभेत संभाजी भिडे प्रकरणावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली.

मुंबई, 02 ऑगस्ट 2023 | राष्ट्रपिता महात्मा गांधींबाबत आक्षेपार्ह विधान करणारे शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्याविरोधात आज विधानसभेत पडसाद उमटले. आज विधानसभेत संभाजी भिडे प्रकरणावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. संभाजी भिडे यांना अटक करा या मागणीवरून सभागृहात गदारोळ माजला. संभाजी भिडे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यांविरोधात काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी आक्रमक पवित्रा घेत त्यांच्यावर कारवाईचा आग्रह धरला. संभाजी भिडे प्रकरणात ‘असंच बोलत राहिलात तर तुमचाही दाभोळकर करू’, अशी धमकीच यशोमती ठाकूरांना देण्यात आली होती. त्यावर “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे,” अशी विनंती त्यांनी केली. त्यानंतर यशोमती ठाकूरांना संरक्षण देण्याचा शब्द उपमुख्यमंत्री यांनी दिला.

 

 

Published on: Aug 02, 2023 02:45 PM