Dilip kumar Death | ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचं निधन
एक महान अभिनेता आपल्यातून गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे. दिलीप कुमार आज जरी आपल्यात नसतील तरी त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून, अभिनयाच्या माध्यमातून, गीतांच्या माध्यमातून ते नेहमी अजरामर राहतील.
ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार (Dilip Kumar) यांचं निधन झालं. ते 98 वर्षांचे होते. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात (Hinduja Hospital) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून ते आजारी होते. दिलीपकुमार यांच्या निधनाने बॉलिवूडसह जगभरातील चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. एक महान अभिनेता आपल्यातून गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे. दिलीप कुमार आज जरी आपल्यात नसतील तरी त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून, अभिनयाच्या माध्यमातून, गीतांच्या माध्यमातून ते नेहमी अजरामर राहतील.
दिलीप कुमार यांच्यावर मुंबईतल्या हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आला होता. परंतु पुन्हा एकदा त्रास सुरू झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या दरम्यान त्यांच्या निधनाच्या अनेक वेळा अफवा आल्या. परंतु प्रत्येक वेळी त्यांच्या पत्नी सायरा बानो या निधनाचे वृत्त फेटाळत त्यांची प्रकृती अगदी व्यवस्थित असल्याचे सांगत आजची सकाळ दिलीप कुमार यांच्या चाहत्यांसाठी आणि चित्रपटसृष्टीसाठी वाईट उगवली. आज सकाळी दिलीप कुमार यांनी अखेरचा श्वास घेतला.