Ganpatrao Deshmukh Funeral | माजी आमदार गणपतराव देशमुख यांचं पार्थिव सोलापुरातील पेनूर गावात दाखल

| Updated on: Jul 31, 2021 | 8:40 AM

Ganpatrao Deshmukh | माजी आमदार गणपतराव देशमुख यांचं पार्थिव सोलापुरातील पेनूर गावात दाखल. थोड्याचवेळात अंत्यसंस्कार केले जाणार. लोकनेत्याला निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतील गावकऱ्यांची पेनूरमध्ये गर्दी.

माजी आमदार गणपतराव देशमुख यांचं पार्थिव सोलापुरातील पेनूर गावात दाखल. थोड्याचवेळात अंत्यसंस्कार केले जाणार. लोकनेत्याला निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतील गावकऱ्यांची पेनूरमध्ये गर्दी.

तब्बल 50 वर्ष राज्याच्या विधानसभेत आमदार म्हणून आपली कारकिर्द गाजविणारे, अभ्यासू नेते, राजकारणातील अजातशत्रू, अत्यंत साधं व्यक्तिमत्व असलेले ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी सोलापूरच्या अश्विनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने राजकारणातील वटवृक्ष हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

गणपतराव देशमुखांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांनी याबाबत माहिती दिली आहे. “आबासाहेबांच्या जाण्याने आमच्या देशमुख कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. राजकारणामध्ये ज्यांनी त्यांच्यासोबत काम केलं त्यांच्या सर्वांसाठी हा मोठा धक्का आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आबासाहेबांची प्रकृती आतापर्यंत चांगली होती. पण आज संध्याकाळी रात्री नऊ वाजता आबासाहेबांचं निधन झालं”, अशी माहिती अनिकेत देशमुख यांनी दिली.

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 31 July 2021
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 31 July 2021