विदर्भवादी नेते राज ठाकरेंविरोधात आक्रमक; ‘या’ नेत्याने राज ठाकरेंना म्हटलं सुपारीबाज
मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्यानंतर विदर्भवादी नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. वेगळ्या विदर्भाबाबत मनसेने घेतलेल्या भूमिकेवर त्यांनी जोरदार टीका केली आहे.
नागपूर : मनसेप्रमुख (MNS) राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या विदर्भ दौऱ्यानंतर विदर्भवादी नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. वेगळ्या विदर्भाबाबत (Vidarbha) मनसेने घेतलेल्या भूमिकेवर त्यांनी जोरदार टीका केली आहे. राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्यानंतर मनसे आणि विदर्भवादी नेते आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे. विदर्भवादी नेते अविनाश काकडे यांनी राज ठाकरेंचा सुपारीबाज असा उल्लेख केला आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की आता नवीन साबण आता आहे चमको साबण. या साबणाने आंघोळ केलेला एक नेता इकडे विदर्भात येतो आणि विदर्भाबाबत स्टेटमेंट देतो, अशी टीका काकडे यांनी केली आहे. तर मनसेकडून देखील काकडे यांच्या टीकेचा जोरदार समाचार घेण्यात आला आहे. अविनाश काकडेंची धुलाई करणार असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे. यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.