वेगळ्या विदर्भासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या घरावर मोर्चा काढणार; विदर्भ आंदोलन समितीचा इशारा

वेगळ्या विदर्भासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या घरावर मोर्चा काढणार; विदर्भ आंदोलन समितीचा इशारा

| Updated on: Jul 31, 2023 | 2:10 PM

वेगळ्या विदर्भाची मागणी आणि विदर्भातील नवीन ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून 37% वीज दर मागे घ्यावे या मागणीसाठी 9 ऑगस्टला विदर्भ आंदोलन समिती देवेंद्र फडणवीस यांच्या घरावर मोर्चा काढणार आहेत.

भंडारा, 31 जुलै 2023 | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार हे रामाचे नाव घेऊन सत्तेत आलेत. मात्र, यांनाही क्लोरोफॉर्म दिल्यासारखी बेशुद्धी आली असून ते वेगळा विदर्भ विसरलेत. या राज्य सरकारचं काम म्हणजे मूह मे राम बगल मे छुरी…राम राम जपना परायामाल अपना, असं विधान विदर्भ आंदोलन समितीचे प्रमुख माजी आमदार वामनराव चटप यांनी केलं आहे. वेगळ्या विदर्भाची मागणी आणि विदर्भात होऊ घातलेल्या नवीन ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून 37% वीज दर मागे घ्यावे या मागणीसाठी 9 ऑगस्टला विदर्भ आंदोलन समिती राज्याचे देवेंद्र फडणवीस यांच्या घरावर मोर्चा काढून आंदोलन करण्यार असल्याची माहिती वामनराव चटप यांनी दिली. विदर्भच्या मागणीसाठी फडणवीस यांच्या घरावर मोर्चा काढणार असल्यचा इशारा वामनराव चटक यांनी दिला.

Published on: Jul 31, 2023 02:10 PM