Vidarbha Rain Update: नागपूर ग्रामीण भागात पूरस्थिती, शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

| Updated on: Aug 11, 2022 | 3:25 PM

आमदार आशिष जैस्वाल यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे. पारशिवनी भागातील कांद्री, टेकडी, गोंडे गावात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गुरुग्राम ते झाडांकडे जाणारा मार्ग त्यानंतर वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

गेल्या चार दिवसांपासून नागपूर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरु आहे. याचा फटका शेती व्यवसायाला बसला आहे. अतिवृष्टीमुळे नागपूर ग्रामीण भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतात पाणीच पाणी झाल्याने पिकाची नासाडी झाली असून बळीराजा पुन्हा संकटात सापडला आहे. कधी नापिकी तर कधी ओला दुष्काळ अशा वेगवेगळ्या समस्यांना विदर्भातला शेतकरी कायमच तोंड देत असतो. यंदा अतिवृष्टीमुळे अनेकांची शेती वाहून गेली आहे. आमदार आशिष जैस्वाल यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे. पारशिवनी भागातील कांद्री, टेकडी, गोंडे गावात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गुरुग्राम ते झाडांकडे जाणारा मार्ग त्यानंतर वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. आमदार आशिष जैसवाल यांनी तहसीलदार प्रशांत सांगडे यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे.

Published on: Aug 11, 2022 09:21 AM