Video- पुरंदरच्या नियोजीत विमानतळाला 7 गावांचा विरोध, कोट्यवधी रुपये दिले तरी जमीन देणार नाही
‘समृद्धी महामार्गाप्रमाणे जमिनी विकत घेऊन विमानतळ करण्याचा घाट शासनाने घातला आहे. मात्र, कोट्यवधी रुपये मिळाले, तरी प्रकल्पाला जमीन देणार नाहीत अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.
पुरंदर विमानतळ जुन्या जागेवर होणार असल्याचे जाहीर करतानाच पारगावासह सातही गावांतील ग्रामस्थांनी विमानतळाच्या प्रकल्पाला विरिध दर्शविला आहे. त्यामुळे येत्या काळात राज्य सरकार आणि प्रकल्पग्रस्तांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पारगाव, खानवडी, मुंजवडी, एखतपूर, कुंभारवळण, वनपुरी आणि उदाची वाडी येथील ग्रामपंचायतींनी पत्रक प्रसिद्ध करत विमानतळाला विरोध असल्याचे सांगितले आहे. , ‘समृद्धी महामार्गाप्रमाणे जमिनी विकत घेऊन विमानतळ करण्याचा घाट शासनाने घातला आहे. मात्र, कोट्यवधी रुपये मिळाले, तरी प्रकल्पाला जमीन देणार नाहीत अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.
Published on: Sep 05, 2022 10:32 AM
Latest Videos