Video: अमरावतीच्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणात माहिती देणाऱ्याला देणार दोन लाखांचे बक्षीस

| Updated on: Sep 13, 2022 | 9:29 AM

Video A reward of two lakhs will be given to the informer in the Umesh Kolhe murder case of Amravati

अमरावतीच्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणात माहिती देणाऱ्याला दोन लाखांचे बक्षीस देणार असल्याची घोषणा एनआयए ने केली आहे. या प्रकरणातील आरोपी शाहीम अहमद फरार आहे. त्याची माहिती देणाऱ्याला दोन लाखांचं बक्षीस देण्यात येणार असल्याचं जाहीर केले. उमेश कोल्हे प्रकरणात आतापर्यंत सात जणांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे समर्थन करणाऱ्या सोशल मीडिया पोस्ट आणि उमेश कोल्हे यांच्या हत्येचा संबंध असल्याची माहिती अमरावती पोलिसांना मिळाली होती. नुपूर शर्मा यांचे समर्थन केलं म्हणून अमरावतीच्या मेडिकल व्यावासायिक असलेल्या उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती.