Video: शिंदे गटात गेल्यानंतर पुन्हा शिवसेनेत वापस, राजू विटकरांनी सांगितले निर्णय बदलण्यामागचे कारण
शिवसेनेला पक्षपुटीचे ग्रहण लागल्यानंतर अनेक जण मूळ शिवसेना सोडून शिंदे गटात सामील होत आहेत. शिवसेना नेते राजू विटकर (Raju Vitkar) हेसुद्धा शिंदे गटात सामील होण्यासाठी गेले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांनी मुंबईत भेट देखील घेतली, मात्र रात्रीतूनच त्यांनी परत शिवसेनेसोबतच काम करण्याचा निर्णय घेतला. TV9 मराठीशी त्यांनी विशेष बातचीत केली. विटकर यांनी आपला निर्णय […]
शिवसेनेला पक्षपुटीचे ग्रहण लागल्यानंतर अनेक जण मूळ शिवसेना सोडून शिंदे गटात सामील होत आहेत. शिवसेना नेते राजू विटकर (Raju Vitkar) हेसुद्धा शिंदे गटात सामील होण्यासाठी गेले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांनी मुंबईत भेट देखील घेतली, मात्र रात्रीतूनच त्यांनी परत शिवसेनेसोबतच काम करण्याचा निर्णय घेतला. TV9 मराठीशी त्यांनी विशेष बातचीत केली. विटकर यांनी आपला निर्णय बदलण्यामागचे कारण सांगितले. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला मात्र रात्री घरी आल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना हा निर्णय आवडला नाही. टीव्हीवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची भाषणं सुरू होती. अनेक वृद्ध आणि अपंग शिवसैनिक रक्ताने पात्र लिहीत आपण अजूनही शिवसेनेसोबत असल्याचे सांगत होते. हे पाहून विटकर याचे मन गहिवरून आले. त्यामुळे त्यांनी परत शिवसेनेसोबत प्रामाणिक पणे काम करण्याचा निर्णय घेतला आहे.