Video: भाजप आणि शिंदे गट आगामी निवडणूक एकत्र लढवणार- श्रीकांत शिंदे

| Updated on: Sep 11, 2022 | 12:15 PM

अमित शहा मुंबई दौऱ्यावर असताना त्यांनी ही गोष्ट स्पस्ट केली होती की आगामी निवडणूका शिंदे गटाची शिवसेना आणि भाजप एकत्र लढवणार असेही खासदार शिंदे म्हणाले.

खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. आम्ही बाहेर पडून सण साजरे करतो मात्र काही जण बाहेर पडताच नाही असे श्रीकांत शिंदे म्हणाले. आगामी निवडणूक भाजप आणि शिंदे गट एकत्र लढणार असेही खासदार शिंदे म्हणाले. गेल्या काही वर्षांमध्ये जे झालं नाही ते केवळ काही दिवसांमध्ये या सरकारच्या माध्यमातून झाले, तसेच येणाऱ्या काळात आंही चांगलं काम या सरकारच्या माध्यमातून होईल असा विश्वासही यावेळी शिंदे यांनी व्यक्त केला. अमित शहा मुंबई दौऱ्यावर असताना त्यांनी ही गोष्ट स्पस्ट केली होती की आगामी निवडणूका शिंदे गटाची शिवसेना आणि भाजप एकत्र लढवणार असेही खासदार शिंदे म्हणाले.

Published on: Sep 11, 2022 12:15 PM