Video: शिरूरमध्ये ढगफुटी सदृश पाऊस, रस्ते जलमय, घरातही शिरले पाणी

| Updated on: Sep 07, 2022 | 10:12 AM

पुणे जिल्ह्याच्या शिरूरमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे. गावाजवळील ओढे नाल्यांना पूर आलेला आहे. यामध्ये दोन जण वाहून गेल्याची घटना समोर आली आहे.  मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झालेले आहेत.

पुणे जिल्ह्याच्या शिरूरमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे. गावाजवळील ओढे नाल्यांना पूर आलेला आहे. यामध्ये दोन जण वाहून गेल्याची घटना समोर आली आहे.  मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झालेले आहेत. लोकांच्या घरात देखील पाणी शिरल्याने जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेले आहे. याशिवाय अहमदनगरच्या लोणी गावात देखील ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे. मुसळधार पावसाने रस्ता दुर्मिळ झाला असून काही वाहने रस्त्याच्या कडेला फासल्याच्या घटना घडल्या आहे. याशिवाय अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे सांगली, नीरज आणि आष्टामध्ये मुसळधार पावसामुळे जवळच्या वड्यांना पूर आलेला आहे.

 

 

Published on: Sep 07, 2022 10:12 AM