Video: मुंबईतून सगळं गुजरातला नेलं जातंय, या सेनेच्या टीकेचा आशिष शेलार यांच्याकडून समाचार
राज्यात इतका विकास होत असतानादेखील पब, पेग आणि पार्टीवाल्या पेंग्विन सेनेला मुंबईतून सगळं गुजरातला जातंय असं ध्वनी प्रदूषण करण्याची नशाच चढली आहे अशी बोचरी टीका आशिष शेलार यांनी केली.
भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. मुंबईतून सगळं गुजरातला नेलं जातंय या सेनेच्या टीकेचा त्यांनी समाचार घेतला. पब, पेंग्विन आणि पार्टीवाली पेंग्विन सेना असा खोचक उल्लेख आशिष शेलार यांनी केला आहे. देशातील सर्वात जुने आर्थिक क्षेत्र असलेल्या अंधेरीच्या सीप्झमध्ये भारत सरकारकडून 200 कोटी खर्च करून उभारण्यात येत आहे. यात 5 लाख रोजगार आणि 30 हजार कोटींच्या निर्यातीचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. नुकतीच त्याची पायाभरणी झाली असे शेलार म्हणाले. देशाची आर्थिक राजधानी मुंबई आर्थिकदृष्ट्या बलवान होणार आमचं ठरलय असं देखील आशिष शेलार यावेळी म्हणाले. राज्यात इतका विकास होत असतानादेखील पब, पेग आणि पार्टीवाल्या पेंग्विन सेनेला मुंबईतून सगळं गुजरातला जातंय असं ध्वनी प्रदूषण करण्याची नशाच चढली आहे अशी बोचरी टीका आशिष शेलार यांनी केली.
Published on: Sep 04, 2022 01:32 PM
Latest Videos