Video: गद्दारीचे दुसरे नाव खोकेवाले- सामनातून बोचरी टीका
शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कुणी घ्यायचा यावरूनसुद्धा जुंपण्याची शक्यता आहे. खोके हराम हे नवे नाव शिवसेनेने शिंदे गटाला दिले आहे.
शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातला वाद दिवसंदिवस चिघळत चालला आहे. पन्नास खोके एकदम ओके यानंतर आता गद्दारीचे दुसरे नाव खोकेवाले अशी बोचरी टीका शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून करण्यात आली आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कुणी घ्यायचा यावरूनसुद्धा जुंपण्याची शक्यता आहे. खोके हराम हे नवे नाव शिवसेनेने शिंदे गटाला दिले आहे. मुख्यमंत्री केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री सिसोदिया यांनी जाहीरपणे सांगितलं आहे की, महाराष्ट्रातील खोक्यांचा फॉर्मुला वापरून आपचे आमदार विकत घेण्याचा प्रकार सुरु झाला आहे. अशी टीका सामनामधून करण्यात आलेली आहे.
Published on: Aug 27, 2022 11:34 AM
Latest Videos