Video | मनोज जरांगे यांच्या दिमतीला आलिशान व्हॅनिटी व्हॅन, परंतू जरांगे ती वापरतच नाहीत
मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील लाखो कार्यकर्त्यांसह चलो मुंबईचा नारा देत अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. या आंदोलकांनी आज पुण्यात प्रवेश केला आहे. पुण्यातील वाहतूक व्यवस्थेवर त्यामुळे ताण आला आहे. येत्या काही दिवसात मराठा आंदोलक मुंबईत प्रवेश करणार आहेत. मराठा समाजसेवकाने जरांगे यांच्या सेवेसाठी आलिशान व्हॅनिटी व्हॅन दिली आहे. परंतू या व्हॅनिटी व्हॅनचा वापर जरांगे पाटील यांनी एकदाही केलेला नाही.
पुणे | 23 जानेवारी 2023 : मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळविण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील मुंबईला आंदोलन करण्यासाठी निघाले आहेत. 20 जानेवारीला मराठा समाज लाखोच्या संख्येने अंतरवली सराटी येथून निघाला आहे. आज मराठा आंदोलकांनी पुण्यात प्रवेश केला आहे. या मजलदर मजल करीत निघालेला मराठा समाज येत्या काही दिवसात मुंबई गाठणार आहे. मराठा आंदोलकांनी जरांगे पाटील यांना आरामकरण्यासाठी आलीशान व्हॅनिटी व्हॅन दिमतीला दिली आहे. या व्हॅनिटी व्हॅनमध्ये सोफा, बाथरुम, फ्रिज, ओव्हनपासून सर्व सुखसोयी आहेत. मराठा सेवक गंगाधर काळकुटे पाटील यांच्या सौजन्याने ही व्हॅनिटी व्हॅन उपलब्ध करण्यात आली आहे. परंतू मनोज जरांगे पाटील यांनी अजूनही या व्हॅनमध्ये पाऊल ठेवलेले नाही. ते कार्यकर्त्यांसोबत रात्रीचा मुक्काम करीत असल्याचे उघड झाले आहे.
Published on: Jan 23, 2024 01:00 PM
Latest Videos