Video | मनोज जरांगे यांचं तिसऱ्यांदा उपोषण सुरु, काय आहेत मागण्या पाहा

Video | मनोज जरांगे यांचं तिसऱ्यांदा उपोषण सुरु, काय आहेत मागण्या पाहा

| Updated on: Feb 10, 2024 | 1:22 PM

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी 10 फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे त्यांचे आजपासून पुन्हा उपोषण आंदोलन सुरु होत आहे. सरकारने येत्या एक ते दोन दिवसात सगेसोयरे अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करावे अशी प्रमुख मागणी जरांगे यांनी केली आहे. आतापर्यंत राज्यभरात 54 लाख कुणबी जातीच्या नोंदी सापडल्या आहेत. त्यांना प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारकडून मिळाला आहे.

जालना | 10 फेब्रुवारी 2024 : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरु केले आहे. त्यांनी सगेसोयरे अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करण्याची प्रमुख मागणी केली आहे. त्यासाठी येत्या एक ते दोन दिवसात विशेष अधिवेशन बोलावून सगेसोयरे अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करावे अशी मागणी केली आहे. तसेच सरकारने मराठा आंदोलकांवर गुन्हे अद्यापही मागे घेतलेले नसल्याचे निदर्शनास आणून देऊन तातडीने गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे. मनोज जरांगे यांचे हे तिसरे उपोषण आहे. गेल्यावेळी त्यांनी 20 जानेवारीला आंतरवाली सराटीतून ‘चलो मुंबई’चा नारा देत लॉंग मार्च काढला होता. त्यानंतर लाखो मराठा बांधव नवीमुंबई आणि आझाद मैदानात जमले होते. मुंबईच्या वेशीवर नवीमुंबईत हे आंदोलन अडवून सरकारने ज्या लोकांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी सगेसोयऱ्यांचे अध्यादेशाचा मसुदा काढला होता. या अधिसूचनेवर सरकारने आता 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती आणि सूचना मागविल्या आहेत. ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी या सगेसोयरे नोटीफिकेशनला विरोध केला आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण न देता स्वतंत्रपणे द्यावे अशी त्यांची मागणी आहे. त्यामुळे त्यांनी सगेसोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या नोटीफिकेशनला कोर्टात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.

Published on: Feb 10, 2024 01:21 PM