Nashik | राज ठाकरेंसोबत सदिच्छा भेट, कोणतीही राजकीय चर्चा नाही ; चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नाशिकमध्ये भेट घेतली. या भेटीबद्दल पाटील यांनी स्वत: माहिती दिली.ो
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची नुकतीच नाशिकमध्ये भेट झाली. दोघांच्या रविवारी सकाळी 15 मिनिटे चर्चा झाली. राज ठाकरे नाशिकमध्ये आहेत, मीही नाशिकमध्येच आहे. आमच्या वेळा जुळल्या तर राज यांच्यासोबत एक कप चहा घ्यायला काहीच हरकत नाही, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी कालच केलं होतं. त्यानुसार ही एक सदिच्छा भेट होती. कोणतीही राजकीय चर्चा नाही. असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.