Video: लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ, निरोप देण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी
ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळीत बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. मुंबईच्या राजावर पुष्पवृष्टी करण्यात येत आहे. दोनीही गणपतीच्या मिरवणुकींना चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.
दहा दिवसाच्या गणेशोत्सवाचा आजचा शेवटचा दिवस. लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. ढोल ताशांच्या नादात भव्य मिववणूक निघाली आहे. मिरवणूमध्ये हजारोंच्या संख्येने भाविक सामील झाले असल्याचे पाहायला मिळतेय. तर दुसरीकडे मुंबईचा राजाची मिरवणूक देखील मोठ्या जल्लोषात निघाली आहे. ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळीत बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. मुंबईच्या राजावर पुष्पवृष्टी करण्यात येत आहे. दोनीही गणपतीच्या मिरवणुकींना चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. तब्बल दोन वर्षानंतर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होतोय त्यामुळे मुंबईकरांमध्ये वेगळा उत्साह पाहायला मिळतोय.
Published on: Sep 09, 2022 10:28 AM
Latest Videos