Vidhal rukmini live darshan: LED स्क्रीनद्वारे विठ्ठल रुक्मिणीचे लाईव्ह दर्शन; वारकऱ्यांसाठी TV9 मराठीचा उपक्रम

| Updated on: Jul 08, 2022 | 2:50 PM

देहू-आळंदीवरुन पायी निघालेल्या वारकऱ्यांना (Pandharpur wari) आस असते ती विठुरायाच्या दर्शनाची. मात्र Tv9 मराठीच्या माध्यमातून पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना LED स्क्रीनद्वारे विठ्ठल रुक्मिणीचे लाईव्ह दर्शन (Vidhal rukmini live darshan) घडवलेय जातेय. त्यामुळे विठ्ठलाच्या दर्शनाने वारकऱ्यांचा पायी प्रवास आणखी सुखकर आनंदी होतोय. ऊन- वारा- पाऊस याची तमा न बाळगता वारकरी शेकडो मैल पायी चालत पंढरीच्या वारीला येतो. […]

देहू-आळंदीवरुन पायी निघालेल्या वारकऱ्यांना (Pandharpur wari) आस असते ती विठुरायाच्या दर्शनाची. मात्र Tv9 मराठीच्या माध्यमातून पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना LED स्क्रीनद्वारे विठ्ठल रुक्मिणीचे लाईव्ह दर्शन (Vidhal rukmini live darshan) घडवलेय जातेय. त्यामुळे विठ्ठलाच्या दर्शनाने वारकऱ्यांचा पायी प्रवास आणखी सुखकर आनंदी होतोय. ऊन- वारा- पाऊस याची तमा न बाळगता वारकरी शेकडो मैल पायी चालत पंढरीच्या वारीला येतो. मृग नक्षत्राची चाहूल लागली की शेतकरी आनंदी होतो, त्या प्रमाणे वारकऱ्यांना ओढ  लागते सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची. आषाढी वारीला लाखो भाविक पंढरीला येतात. यंदा दोन वर्षांच्या खंडानंतर वारी होत आहे. त्यामुळे विठुरायाच्या दर्शनाची आस दरवर्षी पेक्षा जास्तच आहे. यासाठीच TV9 मराठीने ने हा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. या लाईव्ह दर्शनाने वारकऱ्यांना अधिक प्रेरणा मिळत आहे. शिवाय त्यांचा आनंदही द्विगुणित होत आहे.

Published on: Jul 08, 2022 02:45 PM