Aaditya Thackeray | सत्ताधारी पक्षामधील मंत्र्यांचा अभ्यास नाही, सभागृहात सिद्ध – tv9
तसेच कितीही दबाव टाकण्याचा, संपवण्याचा प्रयत्न केला तरी आमचे दौरे सुरू राहतील. शिवसेना ही अशीच उभी राहील. आम्ही फिरत राहू जो यांचा खरा चेहरा आहे तो जनतेसमोर आणू. गद्दारीचा मुखवटा हा फाडत राहू असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
आज अधिवेशनाचा शेवटचा पाचवा दिवस असल्याने सर्वच्या सर्व नेतेमंडळी आज विधानभवनात हजर होती. यावेळी महाविकास आघाडीचे नेतेही हजर होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी ही अधिवेशनात हजेरी लावली. तसेच आदित्य ठाकरे यांनी यावेळी सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांना अभ्यास नसल्याचा टोला लगावला आहे. त्याचबरोबर त्यांनी, विरोधकांना शिवसेना ची भीती वाटत आहे. तर जे गद्दार आहेत, त्यांनी शिवसेना सोडली आणि शिंदेसेनात प्रवेश केला त्यांना असं वाटत होतं की तेथे गेल्यावर मंत्रिपद मिळेल. मात्र ते मिळालेले नसल्याने त्यांच्या चेहऱ्यावर निराशा दिसत आहे. आणि यातूनच आपल्यावर माझ्याविरुद्ध असं बोलून आपली प्रतिमा आणि प्रसिद्धी मिळविण्याचं काम सुरू असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच कितीही दबाव टाकण्याचा, संपवण्याचा प्रयत्न केला तरी आमचे दौरे सुरू राहतील. शिवसेना ही अशीच उभी राहील. आम्ही फिरत राहू जो यांचा खरा चेहरा आहे तो जनतेसमोर आणू. गद्दारीचा मुखवटा हा फाडत राहू असेही आदित्य ठाकरे म्हणाले.