मुख्यमंत्री झाल्यानंतर याच मंचावर आम्ही 'त्यांचा' सत्कार करु; शिंदे यांचा रश्मी ठाकरे यांना शब्द

मुख्यमंत्री झाल्यानंतर याच मंचावर आम्ही ‘त्यांचा’ सत्कार करु; शिंदे यांचा रश्मी ठाकरे यांना शब्द

| Updated on: Mar 09, 2023 | 8:53 AM

विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे यांनी रश्मी ठाकरे यांना आदित्य ठाकरे यांच्या संदर्भात शब्दच देऊन टाकला. सध्या त्याचील चर्चा जोरदार रंगली आहे.

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार गेलं आणि ठाकरे कुटूंबात असणारे दोन्ही मंत्रीपदेही गेली. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून तर आदित्य ठाकरे यांना पर्यावरण मंत्री पदावरून पाय उतार व्हावं लागलं. यानंतर आता पुलाखालून बरेच पाणी गेलं असताना विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे यांनी रश्मी ठाकरे यांना आदित्य ठाकरे यांच्या संदर्भात शब्दच देऊन टाकला. सध्या त्याचील चर्चा जोरदार रंगली आहे. ठाकरे गटाच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज वरळीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आला होता. या कार्यक्रमात सुनील शिंदे यांनी आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील, असं विधान केलं. “रश्मी वहिनी तुम्ही कार्यक्रमाला आलात. ही वरळी शिवसेनेची आहे. ही वरळी उद्धव ठाकरे यांची आहे. ही वरळी आदित्य ठाकरे यांचीच असेल. वहिनी मी तुम्हाला शब्द देतो की, आदित्य ठाकरे इथूनच मुख्यमंत्री होतील. मुख्यमंत्री झाल्यानंतर याच मंचावर आम्ही त्यांचा सत्कार करु”, असं सुनील शिंदे म्हणाले.

Published on: Mar 09, 2023 08:51 AM