शिवसेना आमदार अपात्रतेवरील सुनावणीवर राहुल नार्वेकर यांचं मोठं भाष्य, दिरंगाई होतेय की नाही?
VIDEO | आमदार अपात्र सुनावणीबाबत दिरंगाई केली जात असल्याच्या विरोधकांच्या आरोपांवरही राहुल नार्वेकर यांचं भाष्य, आमदार अपात्रतेवर होणारी सुनावणी 13 ऑक्टोबरला होती. ती 12 ऑक्टोबर रोजी घेतली आहे. या विषायात कोणताही दिरंगाई करायची नाही. लवकर निर्णय घ्यायचा आहे
मुंबई, ११ ऑक्टोबर २०२३ | आमदार अपात्रतेवर होणारी सुनावणी 13 ऑक्टोबरला होती. ती 12 ऑक्टोबर रोजी घेतली आहे. मला या विषायात कोणताही दिरंगाई करायची नाही. लवकर निर्णय घ्यायचा आहे. वेळ घालवायचा नाहीये. म्हणून उद्याच सुनावणी करणार आहे, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. आमदार अपात्र सुनावणीबाबत दिरंगाई केली जात असल्याच्या विरोधकांच्या आरोपांवरही राहुल नार्वेकर यांनी भाष्य केले आहे. मला दिरंगाई करायची असती, वेळ काढायचा असता तर मी सुनावणी पुढे ढकलली असती. पण मी सुनावणी आधीच घेतली. त्यामुळे मला वेळ काढायचाय की सुनावणी लवकर संपवायचीय, याचा विचार करून उत्तर मिळवावं. माझ्यावर टीका केल्याने माझ्या निर्णय प्रक्रियेवर फरक पडणार नाही. टीका करून काही लोकांना निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकायचा असेल त्यामुळे ते असं करत आहेत. पण टीकाकरून माझ्यावर कोणताही दबाव पडणार नाही अथवा मी पडू देणार नाही. नियमानुसारच मी निर्णय घेईल, असेही नार्वेकर यांनी स्पष्टपणे सांगितले.