ओवैसी यांच्या सभेत पुन्हा एकदा औरंगजेब अवतरला? विहीप, बजरंग दल आक्रमक; केली ही मागणी

ओवैसी यांच्या सभेत पुन्हा एकदा औरंगजेब अवतरला? विहीप, बजरंग दल आक्रमक; केली ही मागणी

| Updated on: Jun 25, 2023 | 2:00 PM

अनेक ठिकाणी यावरून हिंदू संघटना आक्रमक झाल्या होत्या. तर कोल्हापुरात दंगलसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. यानंतर आता कुठं राज्यातूल तंग वातावरण पुर्वपदावर येत असतानाच आता पुन्हा एकदा नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

बुलढाणा : राज्यातील अनेक जिल्ह्यात औरंगजेबाच्या स्टेटस आणि फोटोवरून चांगलाच गदारेळ झाला आहे. अनेक ठिकाणी यावरून हिंदू संघटना आक्रमक झाल्या होत्या. तर कोल्हापुरात दंगलसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. यानंतर आता कुठं राज्यातूल तंग वातावरण पुर्वपदावर येत असतानाच आता पुन्हा एकदा नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. बुलढाणा येथे एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या भाषणावेळी मुस्लीम कार्यकर्त्यांनी औरंगजेबच्या घोषणा दिल्या. त्यावरून आता तणाव वाढण्याची शक्यता आहे. यावरूनच आता हिंदु संघटना आक्रमक झाल्या असून विहीप, बजरंग दलाकडून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. तर औरंगजेबाचे उदात्तीकरण खपवून घेणार नसल्याचं स्पष्ट इशाराच देण्यात आला आहे. तसेच त्या व्हिडिओची चौकशीकरून कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Published on: Jun 25, 2023 02:00 PM