Video: वडार समाजाच्या विविध मागण्या घेऊन चौगुले मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
वडार समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचा मुद्दा यावेळी चौगुले यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. याशिवाय सोलापूर येथे वडार समाजाचे शैक्षणिक संस्थांच्या निर्मितीबद्दलही मागणी केली आहे.
वडार समाजाच्या वेगवेगळ्या मागण्या घेऊन शिवसेना नेते विजय चौगुले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला आले आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी वडार समाजाच्या अधिवेशनाला उपस्थिती लावली होती याशिवाय एकनाथ शिंदे यांनीसुद्धा वडार समाजाच्या अनेक मागण्यांची पूर्तता केली असे चौगुले म्हणाले. आता उर्वरित मागण्यांसाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. वडार समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचा मुद्दा यावेळी चौगुले यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. याशिवाय सोलापूर येथे वडार समाजाचे शैक्षणिक संस्थांच्या निर्मितीबद्दलही मागणी केली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी वडार समाजाला काही आश्वासनं दिले होते. त्या पार्श्वभूमीवर समाजाच्या मागण्या मान्य होतील असा विश्वास विजय चौगुले यांनी व्यक्त केला.
Published on: Jul 28, 2022 12:13 PM
Latest Videos