“50 वर्षे राजकारण, 4 वेळा मुख्यमंत्री तरी शरद पवार…”, शिवसेनेच्या नेत्याची टीका
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यक्रमात शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. अहिल्यादेवींनी केलेली कामे देश विसरला नाही. सनातन हिंदु धर्मासाठी अहिल्यादेवींनी काम केली. अनेक हिंदू मंदिरांचा कायापालट त्यांनी केला आहे.
बारामती : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यक्रमात शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. अहिल्यादेवींनी केलेली कामे देश विसरला नाही. सनातन हिंदु धर्मासाठी अहिल्यादेवींनी काम केली. अनेक हिंदू मंदिरांचा कायापालट त्यांनी केला आहे.ज्याचा एकही दगड हलला नाही. नाहीतर आपण PWD ची कामे बघतो.काँग्रेसने 70 वर्षात कधीही देवी-देवतांकडे पाहिले नाही.पंतप्रधान मोदी सत्तेत आल्यानंतर मंदिरांचा कायापालट झाला आहे.आम्ही 50 वर्षे राजकारणात.आम्ही 4 वेळा मुख्यमंत्री झाले, पण एकदाही जेजुरीचा विकास आराखडा करावा असं वाटलं नाही, अशी टीका शिवतारे यांनी शरद पवार यांच्यावर केली.
Published on: Jun 25, 2023 01:36 PM
Latest Videos