शिवसेना संपवण्याचा 2014 पासून शरद पवारांचा प्लॅन होता

“शिवसेना संपवण्याचा 2014 पासून शरद पवारांचा प्लॅन होता”

| Updated on: Oct 09, 2022 | 1:12 PM

"2014 पासून शरद पवारांचा शिवसेना संपवण्याचा प्लॅन होता", असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

अभिजीत पोते, पुणे : माजी मंत्री, शिंदेगटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी शरद पवार आणि शिवसेनेबाबत महत्वाचं विधान केलंय. 2014 पासूनच शरद पवारांचा (Sharad Pawar) शिवसेना संपवण्याचा प्लॅन होता, असा गंभीर आरोप शिवतारे यांनी केला आहे. दोन तीन दिवसांपूर्वीच शरद पवार यांचं विधान होत की, निवडणूक आयोगाचा जो निर्णय असेल तो स्वागतार्ह असेल.यावरून आपल्याला लक्षात यायला हवं की हे मोठे लोकं आहेत काहीही करु शकतात, असं शिवतारे म्हणाले आहेत.