विजय वडेट्टीवार नवे विरोधी पक्षनेते, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची घोषणा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेता कोण असणार? असा प्रश्न उपस्थित झाला होता. अखेर विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आली आहे.
मुंबई, 03 ऑगस्ट 2023 | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेता कोण असणार? असा प्रश्न उपस्थित झाला होता. अखेर विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर विधानसभेत काँग्रेसचं संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसने दावा केला होता. अखेर विजय वडेट्टीवार यांनी विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. सभागृहाकडून वडेट्टीवार यांचे अभिनंदन करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: वडेट्टीवार यांना विरोधी पक्ष नेते पदाच्या खुर्चीवर आसनस्थ केले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वडेट्टीवार यांचे अभिनंदन केले.
Published on: Aug 03, 2023 02:09 PM
Latest Videos